🕒 1 min read
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. यातच आता विधिमंडळात देखील हा मुद्दा गाजत आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली.
फडणवीस म्हणाले,आमच्या काळात मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात कोणती स्थगिती आली नाही. पण आता घटनापीठाकडे जात असताना स्थगिती आली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्या मराठा तरुणांवर सरकारमुळे घरी बसण्याची वेळ आली आहे असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय असताना दुसरीकडे ओबीसी समाजासंदर्भातही संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारमधील मंत्री मोर्चे कसे काढू शकतात? त्यांनी शपथ घेतली आहे. मोर्चा काढायचा असेल तर राजीनामा दिला पाहिजे. सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढत असल्याचं पहिल्यांदा पाहतोय. हेच सरकारविरोधात मेळावे घेत आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला काल खासदार नारायण राणे यांनी कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेत मराठा समाजाच्या प्रश्नांवरून सरकारला खडेबोल सुनावले.विरोधी पक्षाने मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात मांडू नये म्हणून दोन दिवसाचं अधिवेशन घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी आणलेल्या कृषी विधेयकाला विरोधी पक्ष विरोध करून शेतकऱ्यांच्या भावना भडकवत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नारायण राणे यांनी सांगितलं की, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या पदरी अपयश पडलं आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यास सरकारच जबाबदार आहे. सरकारला सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीनं बाजू मांडता आली नाही, असं नारायण राणे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- कृषी कायदा : ‘विरोधक अफवा, गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत त्यांचा अभ्यास शून्य आहे’
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने- दरेकर
- मोदी सरकारसाठी शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी तर भांडवलदार हे उत्तम मित्र- राहुल गांधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
