Share

संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करून मोदी सरकार आपल्या जबाबदा-यांपासून का पळत आहे ?

Published On: 

मुंबई : दिवाळीनंतर देशात कोरोनाचा संसर्गा पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे. दिल्लीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्ये दिवसागणित वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतीविषयक कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी कॉंग्रेसने केली होती. मात्र आता सरकारने अधिवेशन स्थगित केल्याने नवा पेचप्रसंग उभा राहण्याची शक्यता आहे.

याबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली आहे.ते म्हणाले,देशभरात कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं मत मांडलं होतं. त्याचबरोबर संसद भवनाचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे आता जानेवारी 2021 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.

तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतर संसदीय संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोव्हिड साथीच्या काळात जगातील 105 हून अधिक देशांवर ऑनलाईन, शारीरिक अंतर ठेवून आणि इतर नियमांना अधीन राहून अधिवेशन झाली आहेत. भारतीय संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करून मोदी सरकार आपल्या जबाबदा-यांपासून का पळत आहे ? असा सवाल उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!