Share

कंगनाच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान…

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून वाचाळ अभिनेत्री कंगना राणावत हिच्या भोवती फिरताना दिसत आहे. कंगनाने आधी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला नंतर मुंबईची तुलना पाकव्यप्त काश्मीरशी केली आणि या सगळ्यांना भाजपने उघड पाठींबा दिला त्यामुळे कंगना ही अभिनेत्री आहे कि भाजपची प्रवक्ता असेही प्रश्न विचारले जाऊ लागले होते. ओघाने कंगना भाजप प्रवेश करणार अशा वावड्या देखील उठल्या होत्या.

मात्र, यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. कंगनाला राजकारणात येण्याचा कल नाही. हे प्रकरण या सरकारने वाढविले. कंगना काही राष्ट्रीय नेत्या तर नाहीत. यांनीच तसे बनविले. सरकारने त्रस्त करणे आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केवळ त्यांचीच चर्चा करावी, हे योग्य आहे काय? आज एक महिला पूर्ण सरकारला पराजित करीत आहे. काय प्रतिमा राहिली सरकारची ? दुर्दशा झाली. राजासारखी मानसिकता सोडायला हवी. लोकशाहीत कोणी राजा असत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीच काय, मी अन्य कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीये. मी बेधडकपणे बोलत असते, त्यामुळे माझ्या अशा स्वभावामुळे मी राजकारणात टिकू शकत नाही. मी कोणत्याही पक्षामध्ये बांधून राहिल्यासारखं काम करु शकत नाही, असं कंगनाने एका चित्रपटाच्या प्रमोशनावेळी सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!