Share

Uddhav Thackeray | एकनाथ शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याची तयारी, उद्धव ठाकरेंची ठाण्यातून मेगा रॅली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यव्यापी ‘महाप्रबोधन यात्रे’ला सुरुवात करणार आहेत. ठाणे हे मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. आता उद्धव ठाकरे येथील टेंभी नाका येथे पहिल्या जाहीर सभेला संबोधित करणार असल्याचे वृत्त आहे.

उद्धव ठाकरे यांनी याआधीच तरुण आणि जुन्या सोबत्यांच्या सोबत घेऊन सक्रिय सहभागाने पक्षसंघटनेत पुनरुज्जीवन करण्याची योजना जाहीर केली आहे. टेंभी नाक्याला महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्त्वाचे स्थान आहे. हे तेच ठिकाण आहे जिथून एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांनी शिवसेनेच्या विकासासाठी काम केले. आता शिंदेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे टेंभी नाक्यावर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पहिल्या सभेला संबोधित करणार आहेत.

गणपती उत्सवानंतर उद्धव ठाकरे यांच्या यात्रेला सुरूवात-

गणपती उत्सवानंतर उद्धव ठाकरेंच्या यात्रेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरापासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील बंडखोर मतदारसंघांचा दौरा करत आहेत. शिंदे गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघात आदित्य ठाकरे जाणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी होत आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना घेरण्याचा आखला डाव-

आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना घेरण्याचा डाव आखला आहे. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यासह आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याकडे ठाण्यातील बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रस्तावित महाप्रबोधन यात्रेचा समारोप कोल्हापुरातील बिंदू चौकात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!