🕒 1 min read
मुंबई: पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला आहे. मात्र भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यावरूनच मुंबईत भाजपच्या प्रदेशकार्यालयाबाहेर बोलत असतांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी थेट शरद पवारांवर (sharad pawar) निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला.
“शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे”. असे पडळकर म्हणाले आहेत.
दरम्यान “फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधात भूमिका जी शरद पवारांकडे आहे तसले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आहे,” असंहे यावेळी पडळकर म्हणाले आहेत. गोव्यातील भाजपच्या यशाचे संपूर्ण श्रेय गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येत आहे. फडणवीसांची रणनीती भाजपला यश मिळवून गेली. मात्र यावरूनच भाजपकडून मविआ नेत्यांना टार्गेट केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…म्हणून चार राज्यात भाजपला एकहाती सत्ता मिळाली”, भाजप आमदाराने सांगितले कारण
- ‘एक महानायक डॉ.बी.आर.आंबेडकर’ने ५०० एपिसोड्स केले पूर्ण!कलाकार व टीमने आनंद साजरा करत…
- IND vs SL: चाहत्यांसाठी खुशखबर! बंगळुरू येथे होणाऱ्या डे नाईट कसोटीसाठी मैदानावर १००% प्रेक्षकांना परवानगी
- सोयाबीन दरात वाढ; शेतकऱ्यांचा भर साठवणूक केलेल्या सोयाबीन विक्रीवर!
- हवेलीत छत्रपती संभाजी राजेंचे स्मारक उभारणार; अजित पवारांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
