Share

देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शहाच्या भेटीला; ‘या’ प्रमुख मुद्द्यावर होणार चर्चा

Published On: 

नवी दिल्ली : सध्या राज्यात विविध घडामोडी घडत आहे. एनसीबी विरुद्ध राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण अतिशय तापलेले आहे. अशातच राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दरबारी पोहचले आहे. गृहमंत्री अमित शहा यांची ते आज भेट घेणार आहे.

राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत त्यामुळे फडणवीस हे शहा यांना भेटायला गेले आहे. दरम्यान त्यांनी पत्रकारांना सांगितले राज्यातील साखर कारखान्यातील परिस्थिती काय आहे ,त्यांचा तोटा किती आहे ,त्याची आपण सुधारणा कश्याप्रकारे करू शकतो त्याचे निकष काय असतील त्या संदर्भात माहिती काढून आम्ही एक नोट तयार केली आहे. जी आम्ही अमित शहा यांना देणार आहे. जेणे करून अडचणीत असणाऱ्या साखर कारखान्यांना बाहेर काढण्यास मदत होईल.

त्याच सोबत ‘देवेंद्र फडणवीस हे खंडणीखोर अधिकाऱ्याची वकिली करता आहेत’ या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर ते ड्रग्जवाल्यांची वकिली करता आहेत का ? असा उलट सवाल फडणवीस यांनी राऊत यांना विचारला. दरम्यान मुंबई आणि राज्यात ज्या प्रकारे ड्रग्जचा विळखा पडला आहे त्याच्या विरुद्ध लढ्याच्या ऐवजी जर त्यांना समर्थन राऊत करत असतील तर “ईश्वरच मालक आहे”असा खोचक टोला त्यांनी संजय राऊताना लगावला.

दरम्यान नवाब मालिकांबाबत बोलताना ते म्हणाले कुठल्याची तपास अधिकाऱ्याला टार्गेट करणे हे योग्य नाही आहे. तुमच्या कडे जर काही पुरावे असतील तर ते कोर्टात दिली पाहिजे.असा सल्ला त्यांनी नवाब मालिकांना दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!