मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच चढाओढ बघायला मिळत आहे. असे असतांनाच उत्पल पर्रीकर यांच्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, एका मुलाखतीत बोलत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी उत्पल पर्रीकर(Utpal Parrikar) यांच्याविषयी भाष्य केले आहे.
यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘पर्रीकर कुटुंबासोबत आमचे भावनिक नाते असून उत्पल पर्रीकरने जेव्हा निवडणूक लढण्याची इच्छा दाखवली, तेव्हा आम्ही त्याला तीन पर्याय दिले. फक्त इतकेच नाही तर आत्ता तू निवडून ये, पाच वर्षांनी तुला पुन्हा पणजीमधून तिकीट देऊ. तरी त्यानी ऐकलं नाही’, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘मनोहर पर्रीकर हे संघटनेने निर्णय घेतला की ऐकायचे. आमची अपेक्षा तीच होती की उत्पलनेही पक्षाला वेठीला न धरता पक्ष जर आपल्या भल्याचा विचार करतोय, तर ते ऐकायला हवं होते. ते त्यानं ऐकलं नाही याचं आम्हाला दु:ख आहे’, अशी खंतही फडणवीसांनी बोलून दाखवली.
महत्वाच्या बातम्या:
- IPL AUCTION 2022: दिल्लीच्या संघात पुन्हा एक वर्ल्डकप विनींग कर्णधार
- IPL Auction 2022 : १९ वर्षीय खेळाडूवर मुंबईचा करोडोचा ‘तिलक’
- पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची जोरदार तयारी
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
- काँग्रेसला पर्रीकरांवर बोलण्याचा अधिकार आहे का?- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

