Share

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Published On: 

🕒 1 min read

जालना: गेल्या काही महिन्यात राज्यात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसली होती. रुग्णांच्या संख्येत अचानक होणारी वाढ म्हणजेच कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आली होती. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र आता काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी महत्वाची माहिती दिली आहे. त्याच सोबत मास्क मुक्ती बाबत देखील चर्चा सुरू आहे, मात्र मास्क मुक्ती सध्यातरी केली जाणार नसल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्याच सोबत लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन देखील टोपे यांनी केले आहे.

पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, सध्या राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यावधी पर्यत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल. तसेच सध्या राज्यात मास्क मुक्ती केली जाणार नाही. त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिलीय.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!