धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार अनिल गोटे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील सर्वात लबाड माणूस आहेत, अशा शब्दांत गोटे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच गोटे यांनी यातून महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका करताना गोटे म्हणाले की, ‘जनतेचा पाठिंबा असलेले अर्थात मास लीडर संपविण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काही मास लीडर नाहीत. त्यांच्या बोलण्याने सत्य लपत नाही, असे सांगतानाच भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचेही गोटे यांनी म्हटले आहे. या बरोबरच, झोटिंग समितीच्या अहवालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे काही एक नुकसान होणार नाही. असे ते म्हणाले आहेत.
त्यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकातून भाजपवर टीकास्त्र डागताना ते म्हणाले कि, ‘भाजपाचे अतिउत्साही आणि मुख्यमंत्री पदासाठी उतावीळ झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना असे काही वक्तव्य आले की, यांना हर्षवायूच होतो. त्यांनी वृत्तपत्रांना लगेच सांगितले की, ‘शिवसेनेचा व राष्ट्रवादी काँग्रेसचा थरकाप उडाला.’ त्याच दिवशी त्याच वर्तमान पत्रात भाजपातील मराठा समाजाचे नेते अॅड. अशिष शेलार यांनी मात्र ‘काँग्रेसचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची आवश्यकता नाही’ असं जाहीर केलं. भाजपा नेत्यांनी पक्षांतर्गत असलेल्या नेतृत्व स्पर्धेचे उगाच जाहिर प्रदर्शन करु नये. बाहेर आपले हसे होते याचे विस्मरण पडू देऊ नका,’ असाह टोलाह गोटे यांनी भाजप नेत्यांना लगावला असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- जयंत पाटलांनी साधला सुयश जाधवशी संवाद, टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी दिल्या शुभेच्छा
- पंतप्रधान मोदी वाराणसीत दाखल, १५०० कोटींच्या कामांचे लोकार्पण करणार
- पंतप्रधान मोदी युवकांना म्हणाले, ‘ज्याच्याकडे स्किल असेल तोच पुढे जाईल’
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

