🕒 1 min read
जळगाव : काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फडणवीस यांनी पवारांची तब्ब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत असले तरीही या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. या सर्व घडामोडींवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत फडणवीसांवर बोचरी टीका केली होती.
पवार आणि फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांना अशाप्रकारे भेटत असतात, आपल्याकडे तशी परंपरा आहे. रद पवार यांनी फडणवीसांना सत्तेचा कानमंत्र दिला असेल. विरोधी पक्ष अशाचप्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल असा टोला देखील त्यांनी यावेळी फडणवीस यांनी लगावला होता.
यावर जळगावमधील दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संजय राऊतांची अवस्था ना घर का, न घाट का अशी झालीये, याचा तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका. मात्र त्यांना फारसं मनावर घेण्याची गरज नाही,’ अशी टिप्पणी फडणवीसांनी केली आहे. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे जळगावातील केळी बागांचे देखील मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे फडणवीसांनी जळगावचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन मदतीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जात होती. त्यामुळेच, फडणवीसांनी आज जळगावचा पाहणी दौरा केल्याचं भाजपतर्फे सांगण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या
- दिव्यांगांना लस देणारे राज्यातील पहिलेच शहर ठरले ‘औरंगाबाद’!
- रस्ता रूंदीकरण प्रश्नी आ. सतीश चव्हाण यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट!
- ‘मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत’ -राज ठाकरे
- पुणेकरांनो… सलूनसह ‘या’ गोष्टी बंदच राहणार; राज्य सरकारच्या निर्देशामुळे महापौरांचे यू-टर्न
- मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, आम्ही फक्त ५ वर्षे सत्तेसाठी नाही तर २५ वर्षांसाठी एकत्र आलोय – नवाब मलिक

