🕒 1 min read
मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आजारपणातून बरे झाल्यानंतर ही पहिलीच बैठक असल्याने अनेकांचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. या बैठकीला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांच्यासह इतर मंत्री व नेते देखील उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन दिवसांत घेतलेली पवारांची भेट व आज भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी लावलेली हजेरी यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. एकनाथ खडसे आणि फडणवीसांची भेट झाली नसली तरी त्यांच्या घरात जाऊन खडसेंच्या सून व भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याशी फडणवीसांनी चर्चा केली.
दरम्यान, कोरोनाविरोधातील लढाई जिंकणे आमच्यासाठी महत्वाची आहे, सध्या सत्तांतर वगैरे गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ नाही. कोरोना गेल्यानंतर सत्तांतराचं पाहू, असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. आता, फडणवीस वारंवार तारीख पे तारीख देत राहिलेत. त्यांची भविष्यवाणी खरी ठरली नाही, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
पुढे त्यांनी, ‘महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करेल. मुख्यमंत्री म्हणालेत, फक्त ५ वर्षांच्या सत्तेसाठी नाही, तर आम्ही 25 वर्षांसाठी एकत्र आलो. भाजपमध्ये लोक चलबिचल आहेत, त्यांना थांबवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील बोलत राहतात. आम्ही खंबीरपणे तीन पक्ष एकमताने कोरोनावर मात करू लोकांना न्याय देणे, चांगलं शासन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.दावे करून भाजपला यश मिळणार नाही,’ असा दावा देखील केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिव्यांगांना लस देणारे राज्यातील पहिलेच शहर ठरले ‘औरंगाबाद’!
- मंत्री भुमरेंच्या अचानक पाहणीनंतर, प्रशासन झाले खडबडून जागे!
- ‘मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत’ -राज ठाकरे
- पुणेकरांनो… सलूनसह ‘या’ गोष्टी बंदच राहणार; राज्य सरकारच्या निर्देशामुळे महापौरांचे यू-टर्न
- लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी आता शरद पवार इन ऍक्शन; सीरमशी संवाद साधणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
