पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मार्च पासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख हा उतरता असल्याचं दिसून येत आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. एप्रिल महिन्यात पुण्यात पाच ते सहा हजारांहून अधिक रुग्णांची संख्या नोंदवली जात होती. मात्र, कडक निर्बंधांमुळे ही संख्या आता १ हजाराच्या आत आली असून पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. यामुळे आता पुणेकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. पुणे महापालिका क्षेत्रात आता मॉल्स वगळता सर्वच दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आल्याचे काल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले.
मात्र आता सलूनचे दुकानं बंद राहणार असल्याचे आज महापौर मोहोळ यांनी जाहीर केले आहे. ‘पुणे मनपा हद्दीत आपण निर्बंध शिथिल केले असले तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार सलून, पार्लर, स्पा, जिम बंद ठेवण्यात येत आहे. सलून आणि पार्लर सुरु ठेवण्याचा निर्णय आपण स्थानिक पातळीवर घेतला होता. मात्र राज्य सरकारच्या निर्देशानुसार बदल करण्यात आला आहे,’ अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
सलून, स्पा, जिम बंद राहणार !
पुणे मनपा हद्दीत आपण निर्बंध शिथिल केले असले तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार सलून, पार्लर, स्पा, जिम बंद ठेवण्यात येत आहे. सलून आणि पार्लर सुरु ठेवण्याचा निर्णय आपण स्थानिक पातळीवर घेतला होता. मात्र राज्य सरकारच्या निर्देशानुसार बदल करण्यात आला आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 1, 2021
कोणकोणत्या बाबींमध्ये सूट –
१) १४ एप्रिल व २८ मे च्या अदेहसनुसार अत्यावश्यक सेवांसाठीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस रोज सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील.
२) पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहतील.
३) अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर दुकाने (मॉल्समधील दुकाने वगळता) सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील.
४) रेस्टोरन्टस व बार हे पार्सल/ घरपोच सेवांसाठी १४ एप्रिलच्या आदेशानुसार सुरु राहतील.
५) ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त इतर वस्तू (Includes non-essential also) यांची घरपोच सेवा सुरु करण्यास मुभा.
६) दुपारी ३ वाजेनंतर वैद्यकीय सेवा व उत्तरं अत्यावश्यक कारण/ सेवा वगळता इतर नागरिकांना बाहेर पडण्यास पूर्णपणे प्रतिबंध (संचारबंदी) लागू राहील.
७) सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक/कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त) २५ % अधिकारी अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.
८) कृषी संबंधित सर्व दुकाने तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील.
९) मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील.
वरील सर्व नियम व सूट १ जून २०२१ पासून पुढील १० दिवस लागू राहतील. यानंतर पुन्हा एकदा पॉझिटिव्हिटी रेटचा आढावा घेऊन पुढील आदेश देण्यात येतील.
महत्त्वाच्या बातम्या
- एका आठवड्यात ब्लॅक फंगसचं औषध घेऊन येत आहोत, बाबा रामदेवांची सिंहगर्जना
- मंत्री भुमरेंच्या अचानक पाहणीनंतर, प्रशासन झाले खडबडून जागे!
- ‘मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत’ -राज ठाकरे
- पवारांच्या भेटीनंतर फडणवीसांच सत्तांतराबाबत भाष्य; आता राष्ट्रवादीनेही सोडलं मौन
- लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी आता शरद पवार इन ऍक्शन; सीरमशी संवाद साधणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

