मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर महत्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, भारतातील निवडणुका प्रतिकांवर होत असतात. जनतेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बघून शिवसेनेला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघून भाजपला सत्ता दिली, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी देशातील निवडणूक आणि नागरिकांच्या मानसिकेतेवर भाष्य केलं. मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितलं जातं. भारतात निवडणुका प्रतिकांवर होत असतात. लोकांनी मोदींना पाहून मतदान केलं. तर बाळासाहेबांना पाहून सत्ता दिली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. देशात जो लाट निर्माण करतो तो जिंकतो. तसंच झालं. सध्या कोरोनाच्या लाटेवर सगळे स्वार आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
लोक कामाची अपेक्षा करतात. मतदान दुसऱ्याला करतात. त्यामुळेच वर्षानुवर्षे तेच प्रश्न राहतात. गटारी तुंबल्या, रस्ते तसेच, प्रश्न तेच, वर्षानुवर्षे तसंच सुरू राहतं. समाजाने काम केलं तर शाबासकी द्यावी, काम नाही करणार त्याला बाजूला करावं, हे जेव्हा घडेल तेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल, असं सांगतानाच अजित पवारांनी पिंपरीत खूप मोठं काम केलं, पण नशिबी काय आलं, तर पराभव, असंही ते म्हणाले.
तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? असं विचारलं असता राज ठाकरे यांनी ‘परमेश्वरास ठाऊक’ अशा दोनच शब्दांत उत्तर दिलं. आत्ता सध्याचा काळ पाहता या प्रश्नांची उत्तरं नाहीत. इतर कुणाकडेही असतील असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी आता शरद पवार इन ऍक्शन; सीरमशी संवाद साधणार
- मंत्री भुमरेंच्या अचानक पाहणीनंतर, प्रशासन झाले खडबडून जागे!
- ‘महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीयांच्या संयमाचा अंत पाहू नये’; आठवलेंचा इशारा
- चंद्रकांतदादांना माझ्या लग्नाची घाई का ? आदित्य ठाकरेंच चोख प्रत्युत्तर
- राज आणि उद्धव एकत्र येणार का ? ; राज ठाकरे म्हणाले…

