औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी होतांना दिसून येत आहे. मात्र शासनाकडून होणाऱ्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. शहरामध्ये सोमवारी दिव्यांग व्यक्तींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ९० जणांना लस देण्यात आली. दिव्यांगांना लस देणारे पहिलेच शहर म्हणून औरंगाबादचे नाव झाले आहे.
शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र मिलिंदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरणाच्या शिबिरासाठी आमदार शिरसाट यांच्यासह पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डॉ. पारस मंडलेचा, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजू राजपूत, डॉ. दिवाकर कुलकर्णी, डॉ. नलगीरकर उपस्थित होते.
राज्यात औरंगाबादमध्ये सर्व प्रथम दिव्यांगांना कोरोना प्रतिबंधाक लस देण्यात आली. शिरसाट यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दिव्यांग व्यक्तींना कोरोना प्रतिबंधासाठी लस देण्यात आली, लसीमुळे मुलांचे कोरोना संसर्गापासून संरक्षण होईल. पालिकेने शहरात घरोघर जाऊन ज्या घरात दिव्यांग व्यक्ती असतील, त्यांना लस द्यावी. पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या लसीकरणाच्या मोहिमेबद्दल गौरवोदगार काढले. आपल्या शहरातून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, मात्र सर्वांनी अजूनही काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांनो… सलूनसह ‘या’ गोष्टी बंदच राहणार; राज्य सरकारच्या निर्देशामुळे महापौरांचे यू-टर्न
- पवारांच्या भेटीनंतर फडणवीसांच सत्तांतराबाबत भाष्य; आता राष्ट्रवादीनेही सोडलं मौन
- मोदी सरकारचा मोठा निर्णय ; बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब
- ‘मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत’ -राज ठाकरे
- लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी आता शरद पवार इन ऍक्शन; सीरमशी संवाद साधणार


