🕒 1 min read
मुंबई : आज विधान परिषदेच्या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले आहे. १० जागांसाठी हे मतदान झालं. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी आजारी असलेल्या आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना पुन्हा एकदा मुंबईत आणण्यात आले होते. मात्र या दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतल्याने मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे.
जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून काँग्रेसच्या आक्षेपावर निर्णय होत नाही, तोपर्यंत मतमोजणीला सुरुवात होणार नाही. काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने घेतलेले आक्षेप बालिशपणाचे असून, ३ दिवस आधीच निवडणूक आयोगाकडून अशाप्रकारे लेखी परवानगी घेतली आहे, असं स्पष्टीकरण महाजन यांनी दिल.
पुढे ते म्हणाले कि, राज्यसभेच्या निवडणुकीतही असेच मतदान झाले होते. लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांनी नियमानुसारच मतदान केले. मग आताच्या निवडणुकीत आक्षेप का? यात कुठलीही अडचण नाही. निवडणूक अधिकारी याबाबत निर्णय देतील. टाईमपास करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा म्हणून हा आक्षेप घेण्यात आला आहे, असं महाजन म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा तर असंवेदनशीलतेचा कळस असल्याचं म्हणत काँग्रेसच्या आक्षेपावर प्रतिक्रिया दिली आहे. तर परिस्थिती बिकट असताना दोन्ही आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु महाविकास आघाडीने खालच्या पातळीचं राजकारण सुरू केले आहे, असं भाजप आमदार संजय कुंटे म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
