🕒 1 min read
मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. यावर भाजपकडून अनेक प्रतिक्रिया उमटत असून यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“मुंबै बँक प्रकरणात प्रवीण दरेकरांवर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल झाला आहे. मविआ सरकारकडून जाणीवपूर्वक असे केले जात आहे. मात्र आम्ही अशा कारवायांना घाबरत नाही.”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
LIVE | Media interaction at Vidhan Bhavan, Mumbai#BudgetSession #Maharashtra #MaharashtraBudgetSession https://t.co/LGkJedGEuU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 15, 2022
दरम्यान या प्रकरणी स्वतः दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवल्याने सूड भावनेने गुन्ह्याची नोंद झाली असून अनेक दिवसांपासून गुन्हा दाखल करण्याचे हे षडयंत्र सुरु आहे. परंतु हाती काही लागले नाही.’
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022: पंजाब किंग्जने वाढवली ताकद; ‘हा’ प्रशिक्षक बनवणार फलंदाजीची क्रमवारी घातक
- “लडेंगे और जितेंगे भी…“, दरेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
- अक्षयचा मराठमोळा अंदाज! सोलापुरातील मुलीशी मारल्या गप्पा
- शेतकऱ्याच्या मुलाच्या बँक अकाऊंटमधून तब्बल 300 कोटींचा व्यवहार!
- रोहितने घेतली अंपायरची फिरकी; मजेशीर व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
