🕒 1 min read
मुंबई : सध्या भाजप पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासा टार्गेट केलं आहे. भाजप पक्षाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालकिल्ला असलेल्या बारामतीवरून सतत टीका करताना दिसून येतं आहे. अशातच सर्वांच्या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे.
रोहित पवार यांचे वक्तव्य-
आताच्या घडीला बारामती पवारमुक्त करायची. मुंबई ठाकरेमुक्त करायची, या दोन विषयांवर भाजपाचे राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणे, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
तसेच काहीदिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी बारामतीत जात भाजप कार्यकर्त्यांना ताकद देण्यासोबत हा गड जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार असल्याचे थेट सांगितले होते. त्यावरही रोहित पवार म्हणाले की, जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्या बातम्या होणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे चंद्रशेखर बावनुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करतील. पुढे ते असंही म्हणाले की, बारामतीतल्या लोकांवर आमचा विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे.
तसेच पत्रकरांनी रोहित यांना विचारले की, चंद्रशेखर बावनकुळे, मग देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्रीही बारामतीत येणार आहेत. भाजपच्या म्हणण्याप्रमाणे बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव होईल का?, त्यावर रोहित पवार म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलेच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवं.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कंचं मैदान कोण मारणार?, अजित पवार म्हणाले…
- Lumpy Skin Disease | लंपी आजाराने राज्यात ३२ गुरांचा तर जळगाव जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू
- Rohit Pawar । “भाजपाच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे, अन्…”; रोहित पवारांचं आव्हान
- Sachin Tendulkar | ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथच्या निधनानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला…
- Ajit Pawar | “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते” ; अजित पवारांची बावनकुळेंवर खोचक टीका


