Share

Uday Umesh Lalit | न्यायमूर्ती उदय उमेश ललित बनले भारताचे 49 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ललित भारताचे 49 वे सरन्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती एनव्ही रमना यांचा CJI म्हणून कार्यकाळ 26 ऑगस्ट रोजी संपला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती ललित यांना CJI म्हणून शपथ दिली. यावेळी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

देशाचे 49 वे सरन्यायाधीशः

देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून ते केवळ 74 दिवस सर्वोच्च न्यायालयाचे अध्यक्षपद सांभाळतील. सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती ललित हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे प्रमुख असतील ज्यात न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती हिमा कौल, न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी. न्यायमूर्ती बॅनर्जी 23 सप्टेंबर रोजी निवृत्त होत असल्याने न्यायमूर्ती केएम जोसेफ कॉलेजियममध्ये प्रवेश करतील. न्यायमूर्ती ललित हे 8 नोव्हेंबर रोजी CJI म्हणून निवृत्त होणार आहेत.

न्यायमुर्ती उदय उमेश ललित यांचा आहे शांत आणि साधा स्वभावः

न्यायमूर्ती ललित न्यायालयाबाहेरील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारच कमी टिप्पणी करतात. कोर्टातही त्यांच्या मोजक्याच प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. न्यायमूर्ती ललित शांत राहून आपलं काम करतात. न्यायाचा आदर राखण्यासाठी त्यांनी डझनभर महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीपासून दूर व्हायला एक क्षणही घेतला नाही.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!