नवी दिल्ली : ऑलिम्पिक चॅम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपचा विजेता नीरज चोप्रा ‘लुसान डायमंड लीगच्या विजेतेपदासह अॅक्शनमध्ये आला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झुरिच येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत त्याने आपले स्थान निश्चित केले आहे.
स्नायूंच्या दुखापतीतून सावरत नीरज पुन्हा मैदानात परतला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती. परिणामी, त्याला बर्मिंगहॅममधील CWG 2022 मधून माघार घ्यावी लागली होती.
पण जिद्द न सोडत नीरज परत मैदानात उतरला-
पण जिद्द न सोडत नीरज परत मैदानात उतरला आणि शुक्रवारी पहिल्यांदाच नीरजने डायमंड लीग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून त्याला आता भालाफेकमध्ये ‘डायमंड लीग चॅम्पियन’ होण्याची संधी त्याने मिळवली आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर…-
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर, मला डायमंड लीगचे जेतेपद माझ्या मेडल लिस्ट मध्ये जोडायचे आहे अशी भावना निराज ने व्यक्त केली होती. आता ती लवकरच पूर्ण होणार असे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Asia Cup 2022 : रोहित शर्माने पाकिस्तानच्या चाहत्याला मारली मिठी, VIDEO व्हायरल
- Shivsena | “हेच उद्धव ठाकरे साहेबांनी केलं असतं तर…”; मनिषा कायंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा
- Maratha Kranti Morcha | “छत्रपती संभाजीराजे यांचं नेतृत्व आम्हाला नको” – मराठा क्रांती मोर्चा
- Asia Cup 2022 : भारत की पाकिस्तान, आशियातील सर्वात यशस्वी संघ कोणता? दोघांनी खेळले आहेत 129 फायनल
- Pruthviraj Chauhan | काँग्रेस सोडून जाणाऱ्या आमदारांवर पृथ्वीराज चव्हाण उघडपणेच बोलले


