Share

नाथाभाऊंनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही; चंद्रकांत पाटलांची भावनिक साद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ खडसे हे आमचे पालक आहेत. बंद खोलीत त्यांनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे (चॅनेल) वापरू नयेत, असे मत व्यक्त करतानाच खडसे भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान,भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यात खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्यामुळेच भाजप नेते खडसे यांची मनधरणी करताना दिसत आहेत.मात्र ते काल  भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होते.

याबाबत पाटील म्हणाले,खडसे आमचे समजदार नेते आहेत. आमचे पालक आहेत. आम्ही त्यांची मुलं आहोत. चॅनलवाले त्यांना तिकडे ढकलतायत, पण त्यांचे पाय आमच्यात रुतले आहेत. शेवटी खडसे पण एक माणूस आहेत. त्यांना भावना आहेत. त्यांना इतकंच सांगणं आहे की चुकत असेल तर थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका.

दरम्यान,एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिव पदी नियुक्त करून राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न केला गेला मात्र दुसऱ्याबाजूला एकनाथ खडसेंना डावलण्यात आल्याने त्यांनी पक्ष सोडून योग्य निर्णय घ्यावा अशा मागणीचा जोर समर्थकांनी लावला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!