नवी दिल्ली- केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचं गुरुवारी (8 ऑक्टोबर) संध्याकाळी निधन झालं आहे. त्यांचा मुलगा आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
बिहारच्या राजकारणातून ते देशाच्या राजकारणात गेले. सध्या मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री देखील होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर त्यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. पप्पा… तुम्ही या जगात नाहीत पण मला माहित आहे की तुम्ही जिथे आहात सदैव माझ्यासोबत आहात’ असं ट्वीट चिराग पासवान यांनी केलं.
पापा….अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं।
Miss you Papa… pic.twitter.com/Qc9wF6Jl6Z— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 8, 2020
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्वीट करुन शोक व्यक्त केला. केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवानजी यांच्या निधनाने दुःख झाले. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवानजी यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती, त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य
- ‘आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्या उदयनराजेंना भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं’
- अमेरिकेतील उद्योजकांनी भारताकडे आपले पुढचे गुंतवणूक केंद्र म्हणून बघावे- पियुष गोयल
- भारतीय कापसासाठी ऐतिहासिक दिवस; भारतीय कापसाला प्रथमच ब्रँड आणि लोगो मिळाला
- सोलापुरात एम आय एम-शिवसेनेला राष्ट्रवादी पाडणार भगदाड ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

