🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. पोलीस भरतीसह राज्यसेवा पूर्वपरीक्षा (MPSC) पुढे ढकलण्यासाठी मराठा नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह खासदार छत्रपती उदयनराजे भोसले देखील सक्रिय झाले आहेत.
मात्र अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपतींचे वंशज असलेल्या संभाजीराजे व उदयनराजेंवर बोचरी टीका केली.दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे हे कुठं वाचनात आलं नाही. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. मी कुणाला अंगावर घ्यायला घाबरत नाही. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
यावर दोन्ही राजेंच्या समर्थकांसह मराठा नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रकाश आंबेडकर हे ज्यांना जग मानते अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत. छत्रपती शिवराय, शाहू महाराजांचे वारसदार असलेल्या छत्रपती संभाजी राजे, उदयनराजेंबद्दल त्यांनी अनुद्गार काढणे योग्य नाही, असे मत पाटील यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या :-
- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे
- अमेरिकेतील उद्योजकांनी भारताकडे आपले पुढचे गुंतवणूक केंद्र म्हणून बघावे- पियुष गोयल
- भारतीय कापसासाठी ऐतिहासिक दिवस; भारतीय कापसाला प्रथमच ब्रँड आणि लोगो मिळाला
- सोलापुरात एम आय एम-शिवसेनेला राष्ट्रवादी पाडणार भगदाड ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
