Share

फडणवीसांनी तालिबानी विचारांशी केली स्मृतीस्थळ शुद्धीकरणाची तुलना! म्हणाले…

Published On: 

मुंबई – केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात दादर येथील शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून केली होती. दरम्यान, नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन निघून गेल्यानंतर शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून या ठिकाणाचं शुद्धिकरण केलं होतं.

त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. भाजपने या मुद्द्यावरून शिवसेनेला चांगलेच खिंडीत पकडले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर  घणाघाती टीका केली आहे. असं करताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या या विचारांची तुलना थेट तालिबानी विचारसरणीशी केली आहे.

ज्या लोकांनी हे केलं असेल, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे, एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे. अशा प्रकारे वागणं हे योग्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेऊन त्यांच्या समाधीवर कुणी जात असेल, तर ती समाधी अपवित्र झाली असं सांगता. ही कृती अतिशय अयोग्य आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!