Share

Devendra Fadanvis | “उदयनराजे यांच्या पाठिशी आम्ही सगळे आहोत…”, देवेंद्र फडणवीसांचं यांचं मोठं विधान

Published On: 

🕒 1 min read

Devendra Fadanvis | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देत असताना भाजप (BJP) नेते आणि महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना भर सभेत अश्रू अनावर झाले असून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यालाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सहकार्य केलं आहे.

यावेळी, उदयनराजे यांच्या पाठिशी आम्ही सगळे आहोत. छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यामुळे ते भावनेतून बोलले असले तरी महाराष्ट्र आणि देश त्यांच्या पाठिशी आहे. उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“त्या काळात शिवाजी महाराजांनी समाजाचा विचार केला. आज सर्व व्यक्तिकेंद्रीत झाले आहेत. कोणीच अपवाद नाही. राष्ट्रीय पक्ष असो की प्रादेशिक पक्ष. असंच चालत राहीलं तर कितपत चालणार. या देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार?”, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.

यावेळी प्रतिक्रिया देत असताना उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, देश परदेशातून लोक येतात तेव्हा त्यांच्या कानावर शिवाजी महाराजांचं नाव पडतं. कशाला पाहिजे, कशाला हवं बेगडी प्रेम?, रेल्वे टर्मिनसला तरी का नाव द्यायचं?, शिवजयंती तरी का साजरी करायची?, असेही सवाल त्यांनी केलेत.
यानंतर त्यांनी तोंडाला रुमाल लावला आणि त्यांना अश्रू अनावर झाले. मेलो असतो तर बरं झालं असतं, अशा

व्यक्तीविरोधात कारवाई करत नसाल तर कुणालाही शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं देखील ते म्हणाले. तुम्ही इतिहासाची मोडतोड करता. त्यामुळे मागून येणाऱ्या पिढ्यांना हाच खरा इतिहास आहे असं वाटू लागतं त्यामुळे महापुरुषांची बदनामी आणि त्यांची अवहेलना करणे थांबवण्याची त्यांनी सरकारकडे कळकळीची विनंती केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!