Share

Nana Patekar | “एकनाथराव, आम्ही कर भरून आमच्या चौकशा, तुमच्या चौकशा का होत नाहीत?”; नाना पाटेकरांचा थेट सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र राज्यात सध्या बऱ्याच गोष्टी घडताना दिसतं आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मी 100 रुपये आल्यावर 30 रुपये कर भरतो. तुम्ही आणखी 18 रुपये जीएसटी घेता. हे करूनही आमच्या चौकशा होतात, तुमच्या चौकशा का होत नाहीत?’ असा प्रश्न केला आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकरांच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

भ्रष्टाचार केवळ राजकारणाला नाही, तर संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. दुर्दैवाने ही कीड संपवायची असेल, तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील. कारण, भ्रष्टाचारासाठी तुरुंगात जाऊन आलेले, अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले असे लोक खूप मोठ्या बहुमताने निवडून येतात. त्यांना लोक वारंवार निवडून पाठवतात. त्यामुळे समाजात भ्रष्टाचाराविषयी कुठलाही तिरस्कार तयार होत नाही. जोपर्यंत समाज चांगल्याला चांगलं म्हणणार नाही आणि वाईटाला वाईट म्हणणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे आपल्याला सामूहिक प्रयत्न करावे लागतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, अनेकदा लोक विचारतात की त्या उमेदवारावर इतके गुन्हे आहेत तरी कसं तिकीट देता? तेव्हा आम्हाला सांगावं लागतं की त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, पण तोच निवडून येतो. दुसरीकडे सुंदर, साळसुद, स्वच्छ उमेदवार उभं केलं की त्याचं डिपॉझिट जप्त होतं. हे केवळ राजकीय नेते बदलू शकत नाही समाजाला बदलावं लागेल. केवळ समाजावरही टाकून जमणार नाही, तर राजकीय नेत्यांनाही हे परिवर्तन झालं पाहिजे असं वाटावं लागेल. मोदी आल्यानंतर काही प्रमाणात हे सुरू झालं आहे. याला वेळ लागेल. ही कीड लागली आहे, पण किटकनाशक तयार होतंय. ते किटकनाशक ही कीड नक्की दूर करेल, असा मला विश्वास असल्याचं फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते नाना पाटेकर ?

यशवंतराव गेले तेव्हा त्यांच्या खात्यावर 25 हजार रुपयेही नव्हते. आपले मंत्री, नगरसेवक आज निवडून आले की पुढच्या वर्षी कोट्याधीश असतात. त्याची चौकशी का होत नाही? मला कळतं की हा भ्रष्ट आहे, पण तुमच्या का लक्षात येत नाही? एकनाथराव, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही? मी 100 रुपये आल्यावर 30 रुपये उत्पन्न कर भरतो. तुम्ही 18 रुपये आणखी जीएसटी घेता. हे करूनही आमच्या चौकशा होतात, तुमच्या चौकशा का होत नाहीत?

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!