🕒 1 min read
मुंबई : जूनमध्ये झालेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यात अनेक घडामोडी झाल्या. मात्र, त्या सर्व गोष्टींमध्ये लोकांच्या मनात असलेली शिवसेना पक्षाची ओळख कुठेतरी बदलली आहे. सर्वसामान्यांच्या भावना देखील दुखवल्या गेल्या. यावरुन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट काही प्रश्न विचारले आहेत.
नाना पाटेकर यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल –
एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी, समाजवादी, काँग्रेस सगळे वेगळे पक्ष, मात्र, शिवसेना विभागली गेल्यानंतर आमची घर देखील विभागलं गेलं आहे, माझे वडील अथवा भावंड, मुलं यांच्यामध्ये दोन गट पडले असून हे प्रकरण आता तुमच्यापर्यंत मर्यादित राहिलेलं नाही, ते वाढत चालल आहे, त्याचं काय करायचं आम्ही?, असा सवाल पाटेकरांनी उपस्थित केला आहे.
तुमच्यातली भांडणं कदाचित उद्या मिटतील आमच्यातल्या भांडणांचं काय? तळागाळात, गावागावात ही भांडणं सुरुयेत, पण आमच्यातल्या भांडणांचं काय करायचं?, असा प्रश्न नानांनी एक सर्वसामान्य मतदार म्हणून विचारला असून उद्या तुम्ही या कुटनितींना राजकारणाचं नाव द्याल, अशी जाहीर नाराजगी त्यांनी व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर –
नाना पाटेकरांच्या या प्रश्नाला उत्तर देत असताना आमची किंमत तुमच्या भरवशावर ठरते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे केलं, तो मतदारांचा आदरच करुनच केलं, 2019 ला जे होणं अपेक्षित होतं ते आम्ही केलं, मतदारांनी सेना-भाजप युतीला निवडून दिलं त्याचप्रमाणे सरकार स्थापन होईल असं वाटत असतानाच तसं झालं नाही. मात्र, आम्ही ते तीन महिन्यांपूर्वी केलं, असं देखील फडणवीस म्हणाले.
दरम्यान, फडणवीसांच्या उत्तरावर नाना पाटेकरांनी प्रतिप्रश्न करत मग या सर्वांसाठी अडीच वर्ष का लागली?, असा सवाल त्यांनी केला. यावर प्रयत्न सुरु होता पण, तीन महिन्यांपूर्वी त्याला यश मिळालं, असं फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे अडचणीत! धगधगत्या मशालीवर ‘या’ पक्षाचा दावा, निवडणूक आयोगाकडे घेतली धाव
- Ambadas Danve | “गद्दारीची तलवार घेऊन तुम्ही आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केला तरी…”; अंबादास दानवेंचा शिंदे गटावर हल्ला
- Eknath Shinde | “आम्हाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाले, कारण…”; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
- Eknath Shinde | “सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार”
- Eknath Shinde। “आता तरी मान्य करा, खरी शिवसेना…”; एकनाथ शिंदे यांचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
