Share

Manisha Kayande | “…तर तुम्ही ‘महाशक्ती’ची मदत का घेतली?”; मनिषा कायंदेंचा शिंदे गटावर हल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच अंधेरी (पूर्व) पोट निवडणूक असल्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगलेली पाहायला मिळतं आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी याच पार्श्वभूमीवर शिंदे गटावर हल्ला केला आहे.

काय म्हणाल्या मनिषा कायंदे ?

तुम्ही स्व:तला शिवसैनिक म्हणतात. अजूनही आम्ही शिवसेनेतच आहोत म्हणतात. तर मग तुम्हाला घरातील वाद सोडायला गोवा, सुरत, गुवाहाटीला का जावे लागले? तुम्हाला महाशक्तीची मदत का घ्यावी लागली?, असा खोचक सवाल करत मनिषा कायंदे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना त्या असंही म्हणाल्या की. आमच्यामधून जे सोडून गेले ते सतत दावा करत असतात आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. मग रमेश लटके हे पण शिवसैनिक होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. तुम्ही जर खरच शिवसैनिक आहात तर मग एवढी टोकाची भूमिका का घेत आहात?.

तसेच, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिलेल्या चिन्हावर (मशाल) देखील मनिषा कायंदे यांनी भाष्य केलं आहे. आम्हाला जे चिन्ह मिळालं आहे मशाल हे चिन्ह आम्ही घराघरात पोहोचवू. रमेश लटके यांचं काम आणि शिवसेनेचे विचार यामुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत आमचा विजय निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!