Share

BJP | ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल ; मोदींची नक्कल करणं पडलं महागात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी बोलत असताना  शिवसेनेच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काही नेत्यांनी नरेंद्र मोदींची नक्कल देखील केली असल्याचं समजतंय. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात या तिघांसह एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्याच्या गडकरी रंगायतनात रविवारी पार पडलेल्या महाप्रबोधन यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य,भाषणे करत शिंदे यांची प्रतिमा मलीन केली, तसेच इतर राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत शिंदे गटाचे नेते बाळा गवस यांनी तक्रार दाखल केली होती. राऊत, अंधारे, जाधव यांच्यासह धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख आणि समालोचक सचिन चव्हाण यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यावर माध्यमांशी बोलताना अंधारे म्हणाल्या, सत्य मांडणे हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्हाला मान्य आहे, आणि तो आम्ही करणारच सुषमा अंधारे म्हणाल्या. ज्यादिवशी चिन्ह गोठवण्याची बातमी आली त्यादिवशी महाप्रबोधन यात्रेची सुरुवात झाली. त्यामुळे ठाण्यात झालेली गर्दी ही विरोधकांच्या डोळ्यात खुपली असेल, मला नोटीस आली तर पोलीस स्टेशनला हजर होईन. कायदा माझ्या बापानं लिहिला आहे. त्यामुळे त्याचा आदर मी करणार, देखील त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, १५३ अ नुसार गुन्हा झालाय हे कळालं. माझ्याकडे अद्याप नोटीस नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मी नक्कल केलेली नाही. माझ्याकडे व्हिडीओ असते तर मी मोदींचे व्हिडिओ दाखवले असते. मला सांगायची गरज पडली नसती. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत. प्रश्न विचारण, सत्य मांडणे गुन्हा असेल तर आम्ही गुन्हेगार आहोत. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी दबावतंत्र सुरू आह, असं स्पष्टीकरण सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. या संदर्भात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!