Share

Sushma Andhare | “… तर तो गुन्हा आम्ही करणारच”, सुषमा अंधारे कडाडल्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ठाण्यात झालेल्या महाप्रबोधन यात्रेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यातील शिवसैनिकांची गर्दीच साक्ष देते की, आगामी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असतील, असं म्हटलं होतं. काही लोकांनी दिलेल्या वचनांची आठवण करून देण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. यावेळी गद्दारांनी चिन्ह गोठवले, खुद्दारांचे रक्त पेटवले घोषणा त्यांनी दिल्या होत्या. यानंतर खासदार राज विचारे, विनायक राऊत, भास्कर जाधव, अनिता बिर्जे आणि सुषमा अंधारे अशा ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यावरुन सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सत्य मांडणे हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्हाला मान्य आहे, आणि तो आम्ही करणारच सुषमा अंधारे म्हणाल्या. ज्यादिवशी चिन्ह गोठवण्याची बातमी आली त्यादिवशी महाप्रबोधन यात्रेची सुरुवात झाली. त्यामुळे ठाण्यात झालेली गर्दी ही विरोधकांच्या डोळ्यात खुपली असेल, मला नोटीस आली तर पोलीस स्टेशनला हजर होईन. कायदा माझ्या बापानं लिहिला आहे. त्यामुळे त्याचा आदर मी करणार, देखील त्या म्हणाल्या.

संजय राऊतांचे स्पिरीट आमच्याकडे आहे, ते स्पिरीट घेऊन आम्ही लढणार आहोत, नोटीसांना कायदेशीर उत्तर देऊ, असं देखील त्या म्हणाल्या. तसेच चिन्ह गोठवलं, नाव गोठवले एवढं झालं तरी लोक अजिबात खचले नाहीत तर चौपट स्पिरीटनं लोक गर्दी करून आले, असं देखील त्यांनी सांगितलं.

१५३ अ नुसार गुन्हा झालाय हे कळालं. माझ्याकडे अद्याप नोटीस नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मी नक्कल केलेली नाही. माझ्याकडे व्हिडीओ असते तर मी मोदींचे व्हिडिओ दाखवले असते. मला सांगायची गरज पडली नसती. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत. प्रश्न विचारण, सत्य मांडणे गुन्हा असेल तर आम्ही गुन्हेगार आहोत. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी दबावतंत्र सुरू आह, असं स्पष्टीकरण सुषमा अंधारे यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!