मुंबई – गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारला विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून अडचणीत आणले आहे.सध्या राज्यात फोन टॅपिंग प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. या प्रकरणाशी संबंधित राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालावरून राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यात भाजप सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी शुक्ला यांनी फोन टॅपिंगचा राजकीय हेतूने गैरवापर केल्याचा ठपका कुंटे यांच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. गुप्तचर विभागाच्या तात्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विषयी दिलेल्या माहितीवरून राज्यात आरोपप्रत्यारोप होऊ लागले आहेत.
फोन टॅपिंग प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोपवण्यात आलेला अहवाल हा राज्याचे मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांनी तयार केलाच नसेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केला आहे.
मी सीताराम कुंटे यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहेत. त्यामुळे हा अहवाल त्यांनी तयार केलाच नसेल, असे मला वाटते. तर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी हा अहवाल तयार केला असावा आणि सीताराम कुंटे यांना त्यावर केवळ सही करायला लावली असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, तत्कालीन पोलीस महासंचालकांनी याप्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, असे सुचविले होते. मात्र, ही चौकशी कोणाच्या आदेशाने थांबवण्यात आली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. दरम्यान, मुख्य सचिवांच्या अहवालावरही केले प्रश्न उपस्थित केल्याने फडणवीसांचा नेमका विश्वास आहे तरी कुणावर? असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आरोपींना अटक करा म्हणत ‘त्या’ गटाने काढला पोलीस ठाण्यावर मोर्चा
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- संजय राऊतांकडे लक्ष देण्याची गरज नाही : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

