Share

आरोपींना अटक करा म्हणत ‘त्या’ गटाने काढला पोलीस ठाण्यावर मोर्चा

Published On: 

वैजापूर : दोन दिवसांपुर्वी जुन्या भांडणावरुन व्यापार्‍याला दुकानात जाऊन मारहाण केल्याची घटना गजबजलेल्या तहसील कार्यालयाच्या परिसरात घडली. याप्रकरणात परस्परविरोधी फिर्यादीवरुन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यातील एका गटाने सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

या घटनेत शिवसेनेच्या नगरसेविकेचा चिरंजीव पारस घाटे यांना बेदम मारहाण करुन रस्त्यावर लोटून दिले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीवरुन राणा उर्फ मयुर राजपूत, त्याची आई यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पारस घाटे दुकानात असताना, तुझा भाऊ कुठे आहे असे विचारत घाटे यांना चापटबुक्यांनी मारहाण केली. नंतर दुकानाबाहेर ओढून डोक्यात लोखंडी गजाने वार केला. त्यामुळे पारस घाटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तबंबाळ झाले.

काही दिवसांपुर्वी पारस घाटे यांचा भाऊ सुरेश घाटे व राणा राजपूत यांचे भांडण झाले होते. हे भांडण सोडवण्यासाठी राणा यास बोलावुन घाटेंनी मारहाण केली होती. त्याचा राग धरत राणा राजपूत व त्याच्या साथीदारांनी पारस घाटे यांना सोमवारी बेदम मारहाण केली.

मुलाला का मारले हे विचारण्यासाठी गेले असताना दुकानात पारस घाटे, सुरेश घाटे व किशोर घाटे यांनी महिलेला अश्लिल भाषेत शिविगाळ केली व विनयभंग केल्याची तक्रार महिलेने केल्यानंतर घाटेंविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला. पारस घाटे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी राणा उर्फ मयुर राजपूत यास अटक केली आहे. मात्र अन्य आरोपी पसार आहेत. त्यांना पोलिसांनी अटक करावी या मागणीसाठी शहरात मोठा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिस ठाण्यावर धडकल्यानंतर मागणीचे निवेदन देण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!