Share

शरद पवार पत्रकारावर का भडकले ? मुख्यमंत्री म्हणतात…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:-  लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी, पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यासारख्या राजकीय घडामोडींना उधान आले आहे. याच काळात काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांचे भाजप शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांना एका पत्रकाराने पत्रकार परिषदेत त्यांच्या पक्षातील आऊटगोइंगविषयी प्रश्न विचारण्यात आला होता . त्यावेळी ते पत्रकारावर भडकले होते .

याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांना पवारांविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनीही त्यांच्या शैलीत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पवार साहेब मोठे आहेत. मी जास्त बोलणार नाही. पवार साहेबांनी अनेक पक्ष बनवले-तोडले आहेत. अनेक राजकीय खेळी ते खेळले आहेत. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या पक्षातून लोक बाहेर चालले आहेत असे ही ते म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, आज मोदींच्या नेतृत्त्वावर लोकांचा विश्वास आहे. राजकारणामधील तरुणांना मोदींवर विश्वास आहे. यामुळे लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आता पवारांना राग का येतो यावर मी कॉमेंट करणार नाही असे म्हणत त्यांनी पवारांवर  बोलणे टाळले .
दरम्यान राष्ट्रवादी मधील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देत भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांतराचे हे लोण अगदी पवारांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहे. पवारांचे नातेवाईक असलेले उस्मानाबादमधील वजनदार नेते पद्मसिंह पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  याच पार्श्वभूमीवर पत्रकाराने प्रश्न विचारला असता ते पत्रकारावर भडकले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!