Share

निवडणुकीनंतर भाजप विरोधीपक्षही नसेल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच नेते सक्रीय होत आहे. गाठीभेटी, राजकीय दौरे, मोर्चेबांधणी यासारख्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी व विरोधीपक्ष नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे.

याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे असे भाकीत वर्तविले आहे. ते यवतमाळ येथे आयोजित महापर्दाफाश सभेत ते बोलत होते. तसेच पुढे बोलताना विरोधी पक्ष म्हणून शिवसेना राहणार असून भाजपचा पत्ता देखील सापडणार नाही असे म्हणत भाजप वर शाब्दिक निशाणा साधला आहे.

तसेच पुढे बोलताना पटोले म्हणाले शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या या भाजप-शिवसेना सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मातीत गाडा, असे पटोले म्हणाले. तसेच पटोले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

दरम्यान, पुढे बोलताना पत्नी अमृता फडणवीस यांना बढती देण्यासाठी राज्य सरकारच्या अनेक विभागांचे सरकारी खाती मुख्यमंत्र्यांनी अॅक्सिस बँकेत वळविली आहे असा आरोप पटोले यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!