लातूर: कुठल्याही क्षेत्राच्या विकासासाठी त्या क्षेत्रात गुंतवणूक होणं व आवश्यक असतं, असे मत आमदार अभिमन्यू पवार यांनी ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन तेथील शेतकाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले. मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत देवी हल्लाळी, मिरगाळी, नेलवाड, औंढा, शिराढोण व सिरसीवाडी या गावांना भेटी देऊन आ. पवार यांनी येथील शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, कुठल्याही क्षेत्राच्या विकासासाठी त्या क्षेत्रात गुंतवणूक होणं व आवश्यक पायाभूत सुविधा विकसित होणं गरजेचं असतं. शेतकऱ्यांची शेतीत गुंतवणूक करण्याची क्षमता मर्यादित आहे त्यामुळे कृषी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन शेततळे, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प, शेतरस्ते व जनावरांसाठी गोठा अशा सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
शेतकऱ्यांची शेतीत गुंतवणूक वाढली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल, याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही यावेळी आ. पवार म्हणाले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, मंडळ पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व शेतकरी बांधव उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- …अन्यथा निर्बंध पुन्हा नव्याने लावावे लागतील ; वडेट्टीवारांचा इशारा
- शिवसेनेची विचारधाराच चंचल झालीये; दरेकरांची टीका
- स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका योग्यच, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे पटोलेंना समर्थन !
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

