मुंबई : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. यावेळी कोरोना काळात अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेची होत असलेली पडझड लक्षात घेता यंदाचा अर्थसंकल्प यावर काय उपाययोजना आणणारा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेत्या व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी, ‘केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे भाजपचा निवडणूक जाहीरनामा’ असल्याचा घणाघात केला आहे.
‘निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा आहे. ज्या राज्यात निवडणुका तिथे मोठमोठ्या आकड्यांचे पॅकेज द्यायचं. सर्वाधिक टॅक्स, रोजगार आणि स्थैर्य देणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प आहे.’ असं टीकास्त्र त्यांनी सोडलं आहे.
सर्वाधिक टॅक्स, रोजगार आणि स्थैर्य देणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प आहे. #Budget2021
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 1, 2021
तर, ‘कोरोनाची लस मोफत देणार की नाही याची स्पष्ट घोषणा या अर्थसंकल्पात नाही. कामगारांच्या हिताच्या घोषणा नाही. केवळ पोर्टल बनवण्याची घोषणा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. यासोबतच, करदात्या मध्यमवर्गाच्या हाताला काहीच लागलेलं नाही, स्लॅब बदलाची आशा होती मात्र अर्थमंत्र्यांनी निराशाच केली.’ असं भाष्य ठाकूर यांनी केलं आहे.
करदात्या मध्यमवर्गाच्या हाताला काहीच लागलेलं नाही, स्लॅब बदलाची आशा होती मात्र अर्थमंत्र्यांनी निराशाच केली. #Budget2021
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 1, 2021
महत्वाच्या बातम्या

