Share

‘मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर ३० मिनिटे बोलावं’

Published On: 

सिंधुदुर्ग : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. विरोधक हे टीका करत असतानाच भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी देखील अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कागद न घेता अर्थसंकल्पावर ३० मिनिटे बोलून दाखवावं असं निलेश राणे म्हणाले आहेत. ‘देशाचा बजेट आज जाहीर झाला, मागचं वर्ष संकटात गेलं तरी यंदाचा अर्थसंकल्प धाडसी आहे… अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर ३० मिनिट बोललं पाहिजे.’ असं खुलं आव्हान राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

शेअर बाजारात उसळी !

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला शेअर बाजाराने सलामी दिली आहे. अर्थसंकल्पाचं स्वागत करत सेन्सेक्स १६५० अंकांनी वधारला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. सेन्सेक्स १२०० वर पोहोचला असून निफ्टीनेही ३५० अंकांची वाढ नोंदविली आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सेन्सेक्स १६५० अंकांनी व निफ्टी ४७० अंकांनी वधारला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!