Share

‘विकास कमी भकास जास्त, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.

यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे.

पूजाचा मृत्यू होऊन आठवडा उलटला आहे. मात्र, अद्याप संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. एवढेच काय तर राज्याच्या दोन्ही गृहराज्यमंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रियाही दिलेली नाही. दरम्यान, यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘हे तर……महा गा य ब सरकार. मंत्रालयातून मुख्यमंत्री गायब. पूजा प्रकरणातील मंत्री गायब. राज्यातून दोन्ही गृहराज्यमंत्री गायब. प्रत्यक्ष घटना बघणारे दोन्ही साक्षीदार गायब. विकास कमी भकास जास्त. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’, असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण गूढ मृत्यू प्रकरणावरून सरकारवर प्रहार केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!