🕒 1 min read
औरंगाबाद : दोन रेल्वे स्थानकावर भुयारी पुल आणि एका ठिकाणी पादचारी पुलाच्या कामामुळे नांदेड रेल्वे विभागातून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी आणि तपोवन विशेष रेल्वे रद्द करण्यात आल्या होता. मात्र, हा लाइन ब्लॉक रद्द झाल्याने आता या दोन्ही गाड्या नियमित वेळेनुसार धावणार आहे.
मध्य रेल्वे, मुंबई विभागातील दोन रेल्वेस्थानकांवर भुयारी पुलाकरिता आणि एका रेल्वेस्थानकावर पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्याकरिता लाइन ब्लॉक घेण्यात येणार होता. यामुळे नांदेड रेल्वे विभागातून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी आणि तपोवन विशेष रेल्वे रद्द करण्यात आल्याचे या कार्यालयाने ९ मार्चला कळवले होते. परंतु, काही कारणास्तव हा लाइन ब्लॉक रद्द झाल्याचे मुंबई विभागाने कळवले आहे.
त्यामुळे सिकंदराबाद-मुंबई-सिकंदराबाद देवगिरी आणि नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन या विशेष रेल्वे आपल्या नियमित वेळेनुसार धावतील. सिकंदराबाद ते मुंबई (देवगिरी) १३ रोजी व मुंबई-सिकंदराबाद १४ रोजी नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. नांदेड ते मुंबई (तपोवन)१३ रोजी व मुंबई ते नांदेड १४ रोजी नियमित वेळापत्रकानुसार धावेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
- शहरातून पुन्हा तीन दुचाकी लांबवल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
