मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जातीच्या मुद्द्यावरुन एक वेगळंच वळण लागलं आहे. वानखेडेंमुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करत त्यांच्या जातीबाबत अनेक दावे केले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी मलिकांवर टीका केली आहे.
एका ड्रग्ज पार्टीमध्ये रेड पडली. सेलिब्रिटीचा पोर पकडला गेला, गुन्हा मान्य केला, ड्रग्ज नेक्सस उघडणार होतं तेवढ्यात एक मंत्री ड्रग्ज माफियाची बाजू घेऊ लागला आणि आज ते मॅटर ड्रग्ज नेक्ससचं नसून ज्या अधिकाऱ्यानी रेड मारली त्याच्या जातीवर आलंय. नवाब मलिक तुम्हाला नियती माफ करणार नाही, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
एका ड्रग पार्टीमध्ये रेड पडली, सेलिब्रिटीचा पोर पकडला गेला, गुन्हा मान्य केला, ड्रग नेक्सस उघडणार होतं तेवढ्यात एक मंत्री ड्रग माफियाची बाजू घेऊ लागला आणि आज ते मॅटर ड्रग नेक्ससचं नसून ज्या अधिकाऱ्यांनी रेड मारली त्याच्या जातीवर आलंय. नवाब मलिक तुम्हाला नियती माफ करणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 27, 2021
दरम्यान, मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडेचा जो मुद्दा उघड करत आहे तो त्यांच्या धर्माचा नाही. तर ज्या फसव्या मार्गाने त्यांनी IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे आणि एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला वंचित ठेवले आहे ते मला समोर आणायचे असल्याचे मलिकांनी ट्वीट करत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था केविलवाणी झालीये; शिवसेनेचा टोला
- भाजपच्या कार्यक्रमात गुंडांच्या सौभाग्यवतींची हजेरी; गदारोळ होताच चंद्रकांत पाटील म्हणाले, पास नव्हते!


