Share

कंगनाजी, फडणविसांबाबत तक्रार करण्यासाठी तुम्ही राज्यपाल आणि मोदीजींना भेटाल का?

Published On: 

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीसचे लस घेतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नांचं वादळ उठलं आहे.

तन्मय हा चंद्रपूरला राहत असून नागपुरात इंजिनिअरींगचे शिक्षण घेतो. त्याने सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नागपुरात नॅशनल कॅन्सर इंस्टाट्युट येथे लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण झाल्याचा फोटो शेअर केला. मात्र, त्यावरून ट्रोलिंग झाल्यानंतर तो फोटो डिलिट करण्यात आला. मात्र, अनेकांनी याचे स्क्रिनशॉट घेऊन ठेवल्याने फोटो व्हायरल झाला.

राज्यात लसीकरणाचा साठा देखील कमी प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच काही दिवसांपूर्वी वयाच्या अटीमध्ये बसूनसुद्धा अनेकजण लसीकरणापासून वंचित राहिल्याचे दिसून आले. त्यातच आता देवेंद्र फडणवीसांचा पुतण्या तन्मय फडणवीस याचा लस घेतानाच फोटो व्हायरल झाला. त्यामुळे आधीच राज्यात लशींचा तुटवडा आणि त्यातही वयात बसणाऱ्या नागरिकांना लस मिळत नाहीये. त्यात वयाची ४५ वर्ष पूर्ण न करताच देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी काय मिळाली? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी फडणवीस यांच्यावर टीका करण्याची संधी साधली असताना दुसऱ्या बाजूला युथ काँग्रेसचे कर्नाटकातील नेते श्रीवत्स यांनीही तन्मय आणि फडणवीसांचे फोटो ट्विट करून लसीकरणावरून भाजपला आणि अभिनेत्री कंगना रनौत यांना लक्ष्य केले आहे. अभिनेता असून 45 वर्षांपेक्षा कमी वयाची असतानाही तन्मय फडणवीस यांना लसी मिळाली! हे नेपोटिझम आहे की नाही? तन्मय हा बॉलीवूड माफियाचा भाग नाही का? फडणवीस यांच्याबद्दल तक्रार करण्यासाठी तुम्ही राज्यपाल आणि मोदीजी यांना भेटाल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!