Share

कोरोनाचे एवढे मोठे संकट आले तरी दिलेल्या शब्दापासून आम्ही मागे हटलो नाही- बाळासाहेब थोरात

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. राज्यात कोरोनाचे संकट आद्यपही कायम आहे. अशा या संकट काळात महाविकास आघाडी सरकार राज्यातील सर्वसामान्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभे राहिले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. कोरोनाचे संकट आले तरीही आमचे सरकार शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दापासून मागे हटले नाही, असे मत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

संगमनेर तालुक्यातील आयोजित एका कार्यक्रमात ना. थोरात बोलत होते. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपाला चांगलाच टोला लगावला आहे. यावेळी थोरात पुढे म्हणाले की, फडणवीस सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली पहाटे पासून शेतकऱ्यांना रांगा लावायला लावल्या. मात्र प्रत्यक्षात दिले काही नाही. परंतु राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या महामारीमध्ये देखील शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हा महाविकास आघाडी सरकारवर खुश आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी देखील ना.थोरात यांनी केली आहे. केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना भांडवलदाराच्या दावणील बांधणारे शेतकरी विरोधी कायदे सभागृहामध्ये दडपशाहीने मंजूर करून घेतले. यामुळे शेतमालाचा भाव उद्योजकांच्या मर्जीवर राहणार आहे. नव्या कामगार कायद्यामुळे कामगार रस्त्यावर येणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे. हे सरकार पाच वर्षे चांगले काम करेल, असा विश्वासही ना.थोरात यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!