पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा ६६ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावली होती. मात्र नाणेफेक गमावल्यानंतरही कर्णधार कोहली हा आनंदी दिसत होता. मात्र तो का आनंदी होता यामागील कारण कोहलीने उशीरा स्पष्ट केले.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक गमावली होती. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र नाणेफेक हरल्यानंतरही कोहली आनंदी होता. कारण कोहलीने ठरवले होते जर नाणेफेक जिंकलो तर प्रथम फलंदाजी करायची. तसेही आमची गोलंदाजी सक्षम आहे लक्ष्याचा बचाव करण्यासाठी टी-२० मालिकेत याची प्रचिती आलेली आहेच. तेव्हा प्रथम फलंदाजी करताना कोणतीही अडचण येणार नाही. हे कोहलीला ठाऊक होते.
याबद्दल बोलताना कोहली म्हणाला की, ‘याच मैदानावर इंग्लंडने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला होता. त्या सामन्यात केदार जाधवने १२० धावांची दमदार खेळी साकारली होती. मात्र त्या सामन्यात मैदान हे प्रेक्षकांनी भरलेले होते. आज मात्र मैदानात एकही प्रेक्षक नाहीए’ असे तो म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
- हिंगोली स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी निधीला मंजुरी
- पदार्पणातच ‘प्रसिद्ध कृष्णा’ने इंग्रजांची केली फजिती; भारताचा दणदणीत विजय
- वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला चपलांचा हार
- संसदेच्या नवीन इमारतीपेक्षा आज जीव वाचवणे महत्त्वाचे – खा. इम्तियाज जलील
- सार्वजनिकरीत्या होळी, धुलिवंदन साजरा करण्यास मुंबई महापालिकेची मनाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

