Share

पदार्पणातच ‘प्रसिद्ध कृष्णा’ने इंग्रजांची केली फजिती; भारताचा दणदणीत विजय

Published On: 

पुणे : पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर आता भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघांमध्ये एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेत होणारे तीनही सामने पुण्यातील एमसीए (गहुंजे) स्टेडियमवर खेळवले जात आहेत. दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यातील भारतीय संघाची फलंदाजी संपली आहे.

भारत ३०० धावांचा टप्पा पार करेल कि नाही अशी शंका होती. मात्र, कृणाल पांड्या आणि के एल राहुल या जोडीने केलेल्या खेळीमुळे भारताला ३१७ धावांचा डोंगर इंग्लंडच्या संघासमोर रचता आला. भारताकडून रोहित शर्माने ४२ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. तर, गब्बर म्हणजेच शिखर धवनने १०६ चेंडूत ९८ धावा केल्या. त्याचं शतक केवळ २ धावांनी हुकलं.

यानंतर, विराट कोहलीने ५६, श्रेयस अय्यर ६, हार्दिक पांड्या १, के एल राहुल ६२ तर, कृणाल पांड्याने ५८ धावा केल्या आहेत. दरम्यान, इंग्लंडला विजयासाठी ३१८ धावांची गरज होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांची वेळीच लगाम खेचल्याने इंग्लंडचा ६६ धावांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

या सामन्यामध्ये कृणाल पांड्यासह प्रसिद्ध कृष्णा याने देखील एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं आहे. त्याने सलामीवीर जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स यासारख्या खेळाडूंसह टॉम कुरणला बाद करून चार बळी आपल्या नावावर केल्या आहेत. पहिल्याच सामन्यात एवढ्या दिग्गज खेळाडूंचा बळी घेत त्याने भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. यामुळे त्याच क्रिकेट रसिकांकडून कौतुक केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!