Share

हिंगोली स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी निधीला मंजुरी

Published On: 

हिंगोली : शहरामध्ये नव्याने प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातून १०० खाटांचे स्त्रींयांचे रुग्णालय मंजुर झाले असुन या रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी ४०३. १४५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असल्याचे आदेश अल्पसंख्याक विभागाकडून काढण्यात आले आहेत.  हे रुग्णालय बांधल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील महिलांना कोणत्याही आजार तसेच उपचारासाठी दुसऱ्या जिल्हामध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

स्त्री रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी ४२४३.६५ लाख रुपयांचा निधीची गरज पडणार आहे. या मध्ये केंद्र सरकारकडून २५४६. २ लाख तर राज्य सरकारकडून १६९७. ५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. या दरम्यान पहिल्या टप्प्यातील निधी अल्पसंख्याक विभागाकडून उपलब्ध करण्यात आला आहे. दरम्यान केंद्र सरकार ३१८. २७५ लाख तर राज्य सरकार ८४. ८७ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देखील मिळाली आहे. हा निधी महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक आरोग्य सेवा यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

या रुग्णालयाच्या बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वतंत्रपणे मान्यता मिळणार आहे. तर तसे आदेश येणार नाही तो पर्यंत मिळालेला निधी संबंधीत अंमलबजावणीसाठी यंत्रणेला वितरण करु नये असे या आदेशात म्हटले देखील आहे. सक्षम असलेल्या अधिकाऱ्याची तांत्रिक मंजुरी तसेच प्रत्यक्ष निधी मिळाल्याशिवाय येथे प्रत्यक्ष कामास सुरुवात करु नये.  तसेच येथे विकास कामांची अंमलबजावणी ठरवलेल्या कालावधीत पुर्ण करण्याच्या सुचना संबंधीत कार्यालयाने कळवल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!