परभणी : कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटाने शेतकरी स्त्रस्त झाला आहे, म्हणून सक्तीची विज बिल थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी निवेदन देण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांनी उपकार्यकारी अभियंता गैरहजर असल्याने पाहुन संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून निवेदन टेबलवर चिटकवले.
जिंतूर तालुक्यातील शेतकर्यांच्या थकीत बिलासाठी वीज वितरण कंपनीकडून काही दिवसांपासून गावे अंधारात ठेऊन वीज बिलाची सक्तीने वसुली करणे सुरू आहे. तीन वर्षांपासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाला होता. यामुळे शेतकरी आनंदी होता. परंतू परतीच्या पावसाने शेतकर्यांचा हाताशी आलेले पिकाचे नुकसान झाल्यामुळे खुप आर्थिक नुकसान झाले आहे. मागील वर्षीपासून कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. यामुळे जेमतेम झालेले उत्पादनाला कवडीमोल भावाने विक्री करावे लागत आहे. यामुळे उत्पादन खर्च सुद्धा पुरत नाही. यातच महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांचे थकीत विज बिल सक्तीने वसूल करण्याचा सपाटा लावला आहे.
दरम्यान महावितरण कंपनी गावाचे गाव अंधारात ठेऊन शेतकर्यांकडून बळजबरीने वीज बिलाची वसुली सुरू केली आहे. यामुळे शेतकरी परेशान झाले आहेत. संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासन व विद्युत वितरण कंपनीचा जाहीर निषेध केला. शेतकर्यांची विज कट करू नये, ज्या गावाची वीज तोडली आहे, ती पूर्वरत सुरु करण्यासाठी निवेदन देण्यास कार्यकर्ते गेले होते. तर नेहमी गैरहजर राहणारे महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता कार्यालयात हजर नसल्याचे दिसून आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदेंसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची बंगालमध्ये घोषणा
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

