Share

वडिलांचा विरोध असतानाही नागराजने घरी आणला बाबासाहेबांचा फोटो; काय झाले पुढे?

Published On: 

मुंबई : सध्या नागराज यांचा ‘झुंड‘ बॉक्स ऑफिसवर खूप गाजवतोय. या चित्रपटा मधील अमिताभ बच्चन यांच्या समोर बाबासाहेबांचा एक फोटो असणारा, एक फोटो व्हायरल झाला. या फोटोने सोशल मीडियावरचं आपलं स्थान पक्कं केलेलं असताना नागराज मंजुळे यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय वाटतं. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा  फोटो आपल्या घरी आणला, तेव्हा नेमकं काय घडलं? त्याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत…

झुंडमधला हा फोटो पाहून अनेकांना नागराजच्या मनातील बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान काय आहे?, असा प्रश्न पडला. नागराज यांनी एका मुलाखतीत याचं उत्तर दिलं होतं. “मला किंवा माझ्या घरातल्या माणसांना बाबसाहेब आंबेडकर माहित नव्हते. दहावी झाल्यानंतर मला आंबेडकर कळू लागले. बाळू बनसोडे नावाचा माझा मित्र आहे. त्याच्याकडून मला बाबासाहेब समजू लागले. त्याने मला सांगितलं की बाबासाहेबांची हालाकीची परिस्थिती असताना ते कसे शिकले, ते इतरांनाही कसं शिकण्यासाठी प्रोत्साहित करायचे वगैरे…”, असं नागराज यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं. “हळूहळू मला बाबासाहेब आणि माझ्यातलं नातं स्पष्ट व्हायला लागलं.असं  नागराज यांनी या मुलाखतीत सांगितलं.

नागराजने बाबासाहेबांचा फोटो घरी आणला

नागराज यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरात लावल्याचाही किस्सा या मुलाखतीत सांगितला. “बारावीत असताना मी बाबासाहेबांचा फोटो घरात लावायचं ठरवलं. देवाच्या फ्रेममधला देवाचा फोटो काढला आणि त्या फ्रेममध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला. हा फोटो लावल्यामुळे माझ्या वडिलांसोबत माझं 15-20 दिवसांपेक्षा जास्त दिवस भांडण झालं”, असं नागराज यांनी सांगितलं.

 

“वडिल म्हणायचे महाराचा फोटो आपल्या घरात कशाला लावलास? पण मग मी माझ्या वडिलांशी खूप भांडलो. मी त्यांना म्हणालो की तुम्ही जर बाबासाहेबांचा फोटो काढला तर मी देवाचे सगळे फोटो फेकून देईल… पण मग मी पुस्तक वाचून बाबासाहेबांचे विचार वडिलांना सांगितले. बाबासाहेबांनी या या गोष्टी केल्या, असं सांगितलं. त्यांच्यामुळे झालेले बदल सांगितले. त्यांच्यामुळे शाळेतली फी माफ होते. आधी तुम्ही गाडग्यात जेवायचा आता तसं होत नाही. ही सगळी बाबासाहेबांची कृपा आहे. पण तरीही ते म्हणायचे. सगळं खरं आहे, पण जात जात असते. लोकांना आपलं घर महाराचं आहे असं वाटेल, असं वडील सांगायचे. मग मी त्यांना समजावलं की कुणाला काहीही वाटू द्या… आपल्या घरात बाबासाहेबांचा फोटो हवाच! असं करत-करत मी त्यांना समजवलं आणि मग मी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार समजून घेतले”, असं नागराज यांनी या मुलाखतीत सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!