मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे असं वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोललं की तुरुंगात टाकलं जातं आहे.’ असा गंभीर आरोप लगावला होता.
फडणवीस यांच्या या आरोपावर शिवसेनेनं पलटवार केला असून,“फडणवीसांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वाटत होतं, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचं शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले,” असा टोला शिवसेनेनं लागला आहे.
यावरच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून पलटवार केला आहे, ‘सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झाली त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सुरांची चिंता करू नये. आजवर महाराष्ट्रात डौलाने फडकणारा भगवा खाली खेचण्याची तुमचे पोलीस हिंमत करतात हे राज्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवळाची चिंता करा.’ असा टोला भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.
दरम्यान,महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकूमशाही प्रवृत्तीची भीती वाटत नाही. “अठरा दिवसांपासून पंजाब-हरियाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधूर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा?,” असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. “महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला,” असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनसे सोबत आली तर वाईट काय?; निलेश राणेंचं सूचक वक्तव्य
- मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ची पाणीपट्टी थकीत? बीएमसीने केला खुलासा
- ‘…पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला!’
- ‘छोट्याशा अफेअरसाठी किती रडणार?’ हृतिकच्या केसवर रणौतची प्रतिक्रिया
- कोरोना लसीकरण आराखडा तयारकरण्यासाठी केंद्राच्या राज्यांना मार्गदर्शक सूचना


