Share

देशी गर्ल’चे ‘अनफिनिश्ड’ पुस्तक आता हिंदीतही ?

Published On: 

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूड सह हॉलिवूड मध्ये सुद्धा आपले नाव प्रसिद्ध केले आहे. ‘देशी गर्ल’च्या अभिनयाचे भारतातच नाही तर विदेशात सुद्धा चाहते आहेत. प्रियांकाचा विदेशातील पहिल्या शो ‘कोन्टिको’ला चाहत्यांनी खूप प्रतिसाद दिला आणि देशी गर्लने तिच्या दमदार अभिनयाने विदेशी चाहत्यांच्या मनात घर केले. ‘कोन्टिको’ शो नंतर प्रियंकाला हॉलिवूड मधून बऱ्याच ऑफर सुद्धा आल्या. देशी गर्लने आपल्या अभिनयाने भारतातच नाही तर विदेशात सुद्धा नाव गाजवले आहे.

याचदरम्यान प्रियंकाने आपले ‘अनफिनिश्ड’ पुस्तक पब्लिश केले या पुस्तकाला सुद्धा चाहत्यांनी खूप प्रतिसाद दिला. देशी गर्लच्या या ‘अनफिनिश्ड’ पुस्तकाने इतिहास रचला आहे. अवघ्या एका दिवसात तिचे हे पुस्तक अमेरिकेत बेस्ट सेलर ठरले आहे. प्रियांकानेच आपल्या इन्स्टाग्रामवरून ही माहिती देत आनंद व्यक्त केला होता.

‘24 तासांत यूएसच्या बेस्ट सेलर लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा-जोनासचे अनफिनिश्ड पुस्तक आहे.’ अशी पोस्ट अमेरिकेच्या टॉप 10 बुकने केली होती. ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत प्रियांका म्हणाली होती, ‘ज्यांनी आम्हाला 12 तासांत नंबर वनवर पोहचवले त्या सर्वांचे आभार. आशा आहे की हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल.’ ‘अनफिनिश्ड’ हे प्रियांकाचे आत्मचरित्र असून त्यात तिने आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला आहे. अभिनय, निर्मिती आणि गायनानंतर या माध्यमातून पहिल्यांदाच तिने लेखनात नशीब आजमावले आहे. सध्या बॉलीवूडपासून दूर असलेली प्रियांका याआधी ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटात झळकली होती. आगामी काळात ती ‘द मॅट्रिक्स 4’, ‘पॅन बी हीरोज’ मध्ये झळकणार आहे.

त्यांनतर या पुस्तकामुळे प्रियांका खूपच प्रसिद्धीच्या झोतात आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांमध्येच आता या पुस्तकाची हिंदी आवृत्ती प्रकाशित होणार असल्याने बॉलीवूडमधील चाहत्यांनाही ते उपलब्ध होणार आहे.

याबाबत एक पोस्ट करत अभिनेत्रीने संकेत दिले आहेत. प्रियांका चोप्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती एका कागदावर हिंदी भाषेत लिहिताना दिसत आहे. परंतु ही क्लिप शेअर करत तिने कोणताही उल्लेख केलेला नाही. परंतु ती ‘अनफिनिश्ड’च्या हिंदी आवृत्तीकडे इशारा करत असल्याचे प्रतित होते.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!