Share

दानवेंनी बालिशपणा करण्यापेक्षा सिस्टीम समजून घ्यावी; तनपुरेंचा दानवेंना सल्ला

Published On: 

अहमदनगर : राज्य सरकारनेच कोळसा वेळेत घेतला नाही असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. ते वयाने ज्येष्ठ आहेत, त्यामुळे त्यांच्यावर बोलणे योग्य नाही. पण त्यांनी अशी बालिशपणाची वक्तव्य करण्यापेक्षा सिस्टीम समजून घ्यावी, असा टोला राज्याचे नगरविकास आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज लगावला.

दरम्यान, महावितरणचे केंद्र सरकार खाजगीकरण करू शकते, अशी दबक्या आवाजात चर्चा मी ऐकली आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा त्याची भीती वाटत आहे. असे खासगीकरण झाले तर शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा कसा होईल, हाही प्रश्नच असेल, असेही तनपुरे म्हणाले. नगर तालुक्याच्या वीज पुरवठा व पायाभूत सुविधा विषयांच्या आढावासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम शेलार, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, अमोल जाधव, संदेश कारले आदी या वेळी उपस्थित होते.

राज्य सरकारने कोळसा वेळेत घेतला नाही असे वक्तव्य मंत्री दानवे यांनी केले ते अत्यंत चुकीचे आहे. उलट आम्ही वारंवार मागणी केलेली आहे. त्याचे पैसे सुद्धा भरले आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतीच्या वीजेची मागणी वाढली, त्याच वेळी कोळशाचा तुटवडा काही प्रमाणात जाणवत होता, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मागणीमध्ये थोडाफार फरक पडला होता ही वस्तुस्थिती आहे. आम्ही नाकारत नाही. भविष्यामध्ये कोळसा कमी पडू दिला जाणार नाही, याची तरतूद सुद्धा केली जाईल असे ते म्हणाले. राज्यामध्ये कुठेही लोडशेडिंग होणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!