🕒 1 min read
मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरवात केली आहे. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला 8 जुलैपासून सुरवात झाली आहे. यात आदित्य ठाकरे गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून शक्तिप्रदर्शन करतायत. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला आहे.
संजय राऊत म्हणले कि, कायदेशीर लढाईत सेना कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला माहीत आहे, कोणावर कसा दबाव आणला जातो ते. कायद्याची पायमल्ली सुरू असून, लोकशाहीचा खून करण्याचा मिनिटा मिनिटाला प्रयत्न होतोय. तसेच उद्या होणाऱ्या सुनावणीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही हे उद्या कळेल. आमची न्यायव्यवस्था किती दबावात आहे हे उद्या स्पष्ट होईल असे राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दुसरीकडे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे कारशेडवरून शिंदे सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. आम्ही आदिवासी लोकांसाठी आरेमध्ये रस्ते केले नाही. कारण, झाडं तोडली जाऊ नयेत. आम्ही सरकारमध्ये आरे कारशेड कांजूरमार्गला नेत होतो. त्यामुळे १० हजार कोटी वाचले असते. सरकार आरे तोडण्याची भुमिका का घेत आहे कळत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
